वारकरी सांप्रदायाचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंगाच्या मूर्तीला रासायनिक लेपन करू नये राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य यांची मागणी


स्थैर्य, उदगीर, दि. 16 (राहुल शिवणे) : पांडुरंगाच्या मूर्तीस वज्रलेप करण्यात येणार असून तो वज्रलेप हा धर्मशास्त्रानुसारच ज् करायला हवा. देवतांच्या मूर्तीला करावयाच्या वज्रलेप हा धर्म शास्त्रानुसार कसा करावा याचे अनेक अभ्यासू मंडळी देशात आहेत व सर्वात महत्वाचे म्हणजे तो रासायनिक तर अजिबातच असू नये. आपले अनेक वारकरी मंडळी रासायनिक साबण शाम्पू तेल यांचा सुद्धा वापर करीत नाही. प्राकृतिक व आयुर्वेदिक पद्धतीलाच धर्मशास्त्रा मध्ये प्राधान्य देण्यात येते त्यामुळे पांडुरंगाच्या मूर्तीस धर्मशास्त्राचे अभ्यासक मंडळींच्या मार्गदर्शनाने व्हावा अशी आमची सरकार कडे विनंती आहे.

या रासायनिक पद्धतीस अनेक जाणकार मंडळींनी विरोध दर्शविलेला असून ह भ प मारुती शास्त्री तुणतुणे अध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परिषद यांनी सुद्धा या वज्रलेपाच्या बाबतीत सरकारने धर्मशास्त्राचा विचार करूनच निर्णय घ्यावा अशी विनंती केलेली आहे. मंदिर प्रशासन व सरकारने त्वरित रासायनिक वज्रलेपास स्थगिती द्यावी. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!