दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन (२९ ऑगस्ट) हा संपूर्ण भारत देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यामार्फत दिनांक २९ ऑगस्ट, २०२२ रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच सायकल रॅलीमध्ये सातारा श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेज, करंजे पेठ, सातारा, महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा, अनंत इंग्लिश स्कूल, सातारा, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा तसेच जिल्हास्तर खेलो इंडिया मैदानी क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांनी सहभाग घेतलेला होता.
त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार्थी सुजित शेडगे, विक्रम दाभाडे, विक्रांत दाभाडे, आदित्य अहिरे तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. सुदेशना शिवणकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित पुरस्कार्थी यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
याप्रसंगी युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, श्री बळवंत बाबर, क्रीडा मार्गदर्शक अनिल सातव, क्रीडा मार्गदर्शक, राजेंद्र अतनुर, क्रीडा अधिकारी, यशवंत गायकवाड, संजय अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते