दैनिक स्थैर्य | दि. ११ जानेवारी २०२५ | फलटण |
महाविद्यालयीन विद्यार्थी गावामध्ये येऊन सात दिवस श्रमसंस्कार शिबिरामध्ये जे स्वच्छतेचे कार्य करतात व त्याबरोबरच संत गाडगेबाबांचा स्वच्छतेच्या संदेशाबरोबरच पर्यावरणविषयक, आरोग्य विषयक, शेतीविषयक प्रबोधनाचे कार्य करतात, त्यातून विद्यार्थ्यांवर संस्कार तर होतातच, त्याबरोबरच विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्यात एक नाते तयार होते. गावातील लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो. सर्व लोक एकत्र येतात. त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळते. या शिबिराच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण व ग्रामीण विकास या घोषवाक्याखाली या शिबिराचे आयोजन केले होते. स्वच्छतेचा, पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वांना प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
मुधोजी महाविद्यालय, फलटण आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमंत विश्वजीतराजे व वडले गावचे सरपंच डॉ. संतोष लाळगे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे सीडीसी सदस्य श्री. सी. डी. पाटील सर, उपसरपंच सौ. स्वाती मोरे व ग्रामपंचायतीचे इतर सदस्य व कार्यक्रमाधिकारी डॉ. अॅड. ए. के. शिंदे, प्रा. एस. एम. लवांडे, वडले गावातील ग्रामस्थ, महाविद्यालयातील शिक्षक व उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यानंतर शिबिराचे अनुभव कु. अस्मिता गोरे, कु. निखिल तारळकर, कु. समीक्षा शीलवंत तसेच कार्यक्रमाधिकारी व कमिटी मेंबर यांनी सांगितले.
श्री. शिवाजी सोनवलकर सर यांनी मुलींच्या निवासाची व्यवस्था खूप सुंदर केली. त्यामुळे महाविद्यालयीन युवतींना एक नवीन ऊर्जा मिळाली. ग्रामीण जनतेशी शिबिराच्या माध्यमातून त्यांची नाळ जोडली गेली. सरपंच श्री. संतोष लाळगे यांनी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे धडे गिरवले आहेत. महाविद्यालयाने श्रमशिबिराच्या माध्यमातून गावकर्यांना आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
स्वयंसेवक श्रमदान करून श्रमसंस्काराचे धडे गिरवत आहेत. आजच्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्यासाठी हे शिबिर या स्वयंसेवकांना भविष्यात उपयोगी ठरणार आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिबिराचा निश्चित फायदा होईल, असे अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी सांगितले.
शिबिरामुळे समाजसेवेचा बीजांकुर अंकुरला आहे व श्रमसंस्कारामध्ये श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे काम होते व कृतीनिष्ठ कार्य होते. यावेळी वडले गावातील सर्व घटकांनी विशेष मोलाचे सहकार्य केले. सर्व शिबिरार्थींचे आरोग्यही उत्तम आहे. गावकर्यांकडून या स्वयंसेवकांनी काही नवीन बाबी शिकून घेतल्या आहेत. विशेषत: सहकार्याबद्दल त्यांनी सरपंच-उपसरपंच, ग्रामस्थ यांचा गौरव केला.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
या शिबिरामध्ये पर्यावरणसंवर्धन स्त्री सक्षमीकरण व अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, मतदान जनजागृती, स्वच्छ व सुदृढ भारत अभियान इत्यादी विषयावर प्रभात फेर्या काढण्यात आल्या. तसेच पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रियांचे आरोग्य व आहार, फळबाग लागवड, प्रकल्प व वृक्ष संवर्धन काळाची गरज, भारताचा सक्षम युवक, व्यसनमुक्ती जनजागृती इत्यादी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.
कवी श्री. अविनाश चव्हाण, श्री. मुकूंद मोरे, डॉ. सुधीर इंगळे, डॉ. अभिषेक मोरे, डॉ. अलका पोळ, डॉ. माधवराव पोळ, डॉ. नीलिमा दाते, श्री. आदित्य अविनाश, श्री. दादा वाघमोडे, मा. प्राचार्य श्री. रवींद्र येवले आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मुधोजी महाविद्यालयाचे सीडीसी सदस्य, विभागप्रमुख प्राध्यापक, वडले गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.