दैनिक स्थैर्य | दि. ११ जानेवारी २०२५ | फलटण |
माऊली फाउंडेशन आणि मॅग फाउंडेशन संचलित “जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर फलटण” आणि “फलटण वकील संघ फलटण” यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरास रतदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माऊली फाऊंडेशन काळबादेवी, मुंबई या सेवाभावी संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती आणि युवा दिन यानिमित्त रक्तदान सप्ताह साजरा केला जातो. या पूर्ण सप्ताहात माऊली फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि स्वयंसेवक स्वतः रक्तदान करून इतरांनादेखील रक्तदान करणेस प्रवृत्त करतात. दरवर्षीप्रमाणे माऊली फाऊंडेशनतर्फे दि. ७ जानेवारी ते १४ जानेवारी हा रक्तदान सप्ताह साजरा करणेत येत आहे. या रक्तदान मोहिमेसाठी माऊली फाउंडेशनचे फलटण येथील सर्व सेवेकरी यांनी पुढाकार घेतला आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन फलटण येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती चतुर यांनी केले. यावेळी न्यायमूर्ती भूयारकर, जाधव व एस. एन. थापेकर, मॅग फाउंडेशन व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे अध्यक्ष अनिल मोहोटकर, फलटण वकील संघाचे अध्यक्ष अॅड. बापूसाहेब सरक, जनसेवा डायग्नोस्टीक सेंटरचे संचालिका डॉ. दिव्या रसाळ तसेच माऊली फाऊंडेशनचे फलटण येथील सेवेकरी डॉ. अतुल दोशी, फलटण वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. राहुल कर्णे, अॅड. धीरज टाळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गणेश बोराटे, श्री. विठ्ठल ढेंबरे, अॅड. दत्ता कांबळे, अॅड. निलेश बेंद्रे, अॅड. नामदेव शिंदे, अॅड. अविनाश अभंग, अॅड. सुनील शिंदे, अॅड. विकी पोरे, अॅड. राहुल सतुटे, अॅड. विशाल फरांदे, अॅड. रणजीत भोसले, अॅड. तानाजी काळे, प्रा. अभिजित माळवदे, श्री. हरिपाल महामुनी, श्री. विजय उंडाळे, डॉ. गणेश शिंदे, श्री. प्रशांत धनवडे, श्री. रवी साळुंखे, श्री. पराग नडगिरे, श्री. धैर्यशील साळुंखे, श्री. तात्यासाहेब गायकवाड, श्री. पळसे काका, श्रेया रणवरे, प्रणिती लोंढे, फलटण वकील संघाचे सदस्य, फलटण कोर्टातील स्टाफ, रक्तदाते उपस्थित होते.
रक्तदानाचे सामाजिक कार्य पार पाडत तब्बल ६० जणांनी या शिबिरात रक्तदान केले.