
दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । फलटण । सासवड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचालित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषिदूत कृषी कार्यानुभव उपक्रम अंतर्गत दि. २३ डिसेंबर
रोजी महात्मा फुले विद्यालय सासवड येथे राष्ट्रीय किसान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अनपट व उपप्राचार्य तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन. एस. ढालपे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा. एस. वाय. लाळगे यांचे कृषिदूत अभिषेक जाधव, अक्षय जगताप, विराज कदम, दिपराज इंगळे, प्रसाद जाधव, हर्षवर्धन इंगळे व प्रज्वल धुमाळ यांना मोलाचे मागदर्शन लाभले.