सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने मंगळवारपासून दासनवमी उत्सवाचे आयोजन

गायन, वादन, प्रवचन, कीर्तन व सामुदायिक दासबोध पारायण आदी विविध कार्यक्रम


स्थैर्य, 29 जानेवारी, सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सज्जनगडावर दरवर्षी दास नवमीचा पुण्यतिथी उत्सव साजरा होतो. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी, माघ वद्य नवमी इ. स. 1682 या दिवशी सज्जनगडावर समाधीस्थ झाले. या दिवसाला ’दासनवमी’ म्हणतात. सद्गुरु समर्थांच्या या पुण्यपावन स्मरणार्थ ’सज्जनगड’ येथे ’श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड’ यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

या वर्षी ’श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड’ यांच्याव्दारे आयोजित ’दासनवमी उत्सव’ माघ वद्य प्रतिपदा ,1947 ते माघ वद्य नवमी ,1947 मंगळवार दि. 2 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दि. 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत साजरा होणार आहे.

या उत्सव काळामध्ये मंडळाचेवतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये गायन, प्रवचन, कीर्तन, सामुदायिक दासबोध पारायण असे कार्यक्रम होणार आहेत .दासनवमी उत्सव काळात सामुदायिक दासबोध पारायण दररोज सकाळी 8 ते 10.30 पर्यंत होणार असून यासाठी व्यासपीठ चालक समर्थ भक्त विद्याधर बुवा वैशंपायन, व समर्थ भक्त सौ.रसिकाताई ताम्हणकर हे सेवा देणार आहेत .उत्सव काळामध्ये दररोज प्रवचन सेवा गुरुवार, दि. 2 ते 11फेब्रुवारी 26 या कालावधीत दररोज सकाळी 10.30 ते 11.30 यावेळेस संपन्न होणार असून यामध्ये दि.2 ते 4 फेब्रुवारी प्रा.डॉ. अजित कुलकर्णी यांचे प्रवचन होणार आहे. दि.5 फेब्रुवारी स. भ. रवींद्र पाठक यांचे प्रवचन, दि. 6 ते 11 फेब्रुवारी स. भ. गुरुनाथ महाराज कोटणीस यांचे प्रवचन होणार आहे.

कीर्तन सेवा दररोज सायंकाळी 4 ते 6 यादरम्यान होणार आहे.दि. 2 व 3 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील ह. .भ प. कीर्तनकौस्तुभ शामबुवा घुमकेकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे .दि. 4 व 5 फेब्रुवारी रोजी बीड ,माजलगाव येथील लक्ष्मीप्रसाद पटवारी, कुलकर्णी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. दि.6 व 7 फेब्रुवारी रोजी पनवेल येथील ह. भ .प. नंदकुमार कर्वे बुवा यांचे कीर्तन होणार आहे .दि. 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांचे कीर्तन होणार आहे. दि. 9 व 10 फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.

संगीत व गायन सेवेत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता विविध मान्यवर गायक ,वादक यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे .यामध्ये दि. 2 फेब्रुवारी रोजी लालगुडी कृष्णन यांचे एकल कर्नाटकीय व्हायोलिन वादन सादर होणार आहे .दि. 3 फेब्रुवारी रोजी पं.जयंत केजकर यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय गायन होणार आहे .दि.4 फेब्रुवारी रोजी अभयसिंह वाघचौरे यांचे गायन होणार असून त्यांना तबला साथ राघव नरेवाडीकर तर संवादिनीवर साथ स्वानंद राजपाध्ये करणार आहेत. दि. 5 फेब्रुवारी रोजी ठाणे येथील अमेय कारुळकर व डोंबिवली येथील श्रेयस व्यास यांचे सुश्राव्य गायन होणार असून या कार्यक्रमासाठी तबला साथ अभिनव जोशी पखवाजावर गणेश मेस्त्री ,ऑर्गनवर सुशील गद्रे व व्हायोलिन वर उदय गोखले यांची साथ राहणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर हे करणार आहेत.

दि. 6 फेब्रुवारी रोजी ठाणे येथील सौ.श्रुती गोडबोले व श्रद्धा जोशी यांचे सुश्राव्य गायन होणार असून त्यांना तबला साथ सुहास चितळे,पखवाजावर गणेश मेस्त्री,संवादिनीवर हर्षल काटदरे,ऑर्गनवर सुशील गद्रे व व्हायोलिनवर उदय गोखले यांची साथ राहणार आहे. दि. 7 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सौ.राजश्री वैरागकर व ठाणे येथील अजिंक्य पोंक्षे यांचे सुश्राव्य गायन होणार असून या कार्यक्रमाचे निवेदन पूर्वा पेठे या करणार असून तबला साथ सुहास चितळे, पखवाजावर साथ गणेश मिस्त्री, संवादिनीवर साथ हर्षल काटदरे ऑर्गनवर साथ सुशील गद्रे, वायोलिन वर उदय गोखले यांची साथ राहणार आहे .दि.8 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सौ.सावनी दातार व गोवा येथील सुभाष परवार यांचे गायन होणार असून यावेळी तबला सुहास चितळे, पखवाजावर गणेश मिस्त्री ,संवादिनीवर हर्षल काटदरे, ऑर्गन वर सुशील गद्रे व व्हायोलिन साथ उदय गोखले यांची राहणार आहे. दि.9 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सौ. कल्याणी देशपांडे यांचे सतार वादन तर बोरीवली येथील अद्वैत काशीकर यांचे बासरी वादन होणार असून यावेळी तबला साथ तनय रेगे ,मुंबई हे करणार असून या कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी करणार आहेत. दि.10 फेब्रुवारी रोजी पंडित राम देशपांडे व गंधार देशपांडे यांचे सुश्राव्य गायन होणार असून यावेळी ऑर्गनवर सुशील गद्रे, संवादिनी वर साथ हर्षल काटदरे, तबला साथ अभिजीत बारटक्के व्हायोलिनवर साथ उदय गोखले, पखवाजावर साथ गणेश मेस्त्री यांची राहणार आहे.व या कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी करणार आहेत.

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड’ सर्व भक्तांना उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी, आमंत्रण करीत आहे. तसेच हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून या कार्यक्रमात समर्थ भक्तांनी तन-मन-धन अर्पून सहभागी व्हावे असे आवाहनअध्यक्ष समर्थ भक्त गुरुनाथ महाराज कोटणीस,मंडळाचे कार्याध्यक्ष समर्थ भक्त डॉ.अच्युत गोडबोले व समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!