
स्थैर्य, फलटण, दि. २७ : केंद्रातील भाजपा सरकारने केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे व इंधन दरवाढ विरोधात आज फलटण शहरातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके), जिल्हा निरीक्षक नाजिमभाई इनामदार, तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, अशोक शिंदे, शहर अध्यक्ष पंकज पवार, महिला अध्यक्ष सौ. सुजाता गायकवाड, महिला तालुका उपाध्यक्ष श्रीमती इंदुमती घोलप, जिल्हा सरचिटणीस शंकर लोखंडे, शंकर उर्फ बंडू कदम, युवक तालुका अध्यक्ष अजिंक्य कदम, शहर युवक अध्यक्ष प्रितम जगदाळे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष ताजुद्दिन बागवान, अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिदार्थ दैठणकर, अभिजित जगताप, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शरद नाळे व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते शेतकरी, कामगार यांच्या उपस्थितीत फलटणचे तहसिलदार समिर यादव साहेब यांना निवेदन देण्यात आले.