‘रेल नीर’च्या धर्तीवर आता एसटीमध्ये मिळणार ‘नाथजल’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.३: राज्य परिवहनच्या
लाखो प्रवाशांना स्वस्त दरात शुद्ध पाणी मिळण्याच्या उद्देशाने ‘नाथजल’ या
शुद्ध पेयजल योजनेचे लोकार्पण करण्यात आले.

या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाची अधिकृत
पिण्याच्या पाण्याची बाटली उपलब्ध होणार आहे. याचे नामकरण ‘नाथजल’ असे
करण्यात आले आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे.
त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते.
त्यांच्या आदर प्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद प्येयजलास ‘नाथजल’ असे
नाव देण्यात आले आहे.संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरवण्यासाठी मे.शेळके
बेव्हरजेस प्रा.लि. पुणे (ऑक्सिकूल) या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
सर्व बस स्थानकांवर 650 मिलीलिटर व 1 लिटरच्या बाटल्या उपलब्ध असणार आहेत.
यांचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये असल्याची माहिती एस.टी.
महामंडळाकडून देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व
बसस्थानकावर एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे
बसस्थानकावर कोणत्याही इतर कंपन्यांचे प्येयजल विकण्यास बंदी असेल.
सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!