नरहरबुवा कर्‍हाडकर कीर्तनकार पुरस्कार राघवेंद्र स्वामी यांना प्रदान


दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। फलटण । प्रसिद्ध कथा प्रवचनकार प्रवक्ते श्री समर्थभक्त श्री राघवेंद्रबुवा रामदासी देशपांडे यांना करवीर पीठ कोल्हापूर यांचा 2025 सालचा नरहरबुवा कर्‍हाडकर कीर्तनकार पुरस्कार जगदगुरु श्रीमद शंकराचार्य स्वामी महाराज कोल्हापूर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

यावेळी अनेक कीर्तनकार, प्रवचनकार उपस्थित होते. त्याचबरोबर राघवेंद्र स्वामी यांनी आपली आई मानलेल्या फलटण येथील शिक्षिका आळतेकर आवर्जून कार्यक्रमास उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!