
![]() |
निवासी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करताना सागर भोगावकर |
स्थैर्य, सातारा, दि. 13 : सातारा नगरपालिकेतील आरोग्य ठेकाप्रकरणी अॅन्टी करप्शनने केलेल्या कारवाईतील दोषींची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी देवदूत फाऊंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्ते सागर भोगावकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा नगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या कचरा ठेक्याच्या कामाच्या भरलेल्या डिपॉझिटचा परतावा मिळण्याकामी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक गणेश टोपे, प्रवीण यादव, राजेंद्र कायगुडे यांनी मागणी केलेल्या लाचप्रकरणी त्यांना अॅन्टी करप्शनने कारवाई करुन ताब्यात घेतले आहे. आता याप्रकरण्ी आणखी किती अधिकार्यांचा व इतरांचा यामध्ये समावेश आहे, याचा खुलासा व तपास होणे गरजेचे आहे.
दोषी आढळलेल्या व्यक्ती याप्रकरणी दबाव आणण्याची शक्यता असल्याने ते त्यांच्या जबाबात अधिक माहिती लपवण्याची शक्यता असल्याने संबंधितांची नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. याबाबत संबंधितांना तसे आदेश करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.