अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपनेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.१०: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या घराबाहेर स्काॅर्पिओत जिलेटिनच्या छड्या आढळल्या होत्या. यानंतर स्काॅर्पिओत मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. आता या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापले आहे. मनसुख हिरेन प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमध्ये गृहमंत्र्यांनी सचिन वझे यांना क्राइम ब्रांचमधून काढल्याची घोषणा केली. दरम्यान आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत.

नाना पटोले माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. मात्र त्याचा वापर करण्यास परवानगी अद्याप मिळालेली नाही. यासोबतच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानीच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत आहेत. यामुळे त्यांनी मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यामधून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे’ असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

अंबानींना एवढी सुरक्षा असूनही गाडी तिथपर्यंत कशी पोहोचली?
नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, ‘अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर एक गाडी सापडली. ज्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तीक सुरक्षा व्यवस्था आहे. मग तरीही ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी? असा प्रश्न आहे. 2009 साली अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घात पात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता’ असेही नाना पटोले म्हणाले. तसेच भाजपवर आरोप करत पटोले म्हणाले की, राज्यात व देशात असलेल्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपनेच या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला आहे.


Back to top button
Don`t copy text!