‘सचिन वझे हे ओसामा बिन लादेन असल्यासारखे वातावरण तयार केले जातेय’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


स्थैर्य, मुंबई, दि.१०: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी भाजपने सरकारला कोंडीत पकडले आहे. यानंतर एपीआय सचिन वझे यांच्या बदलीची गृहमंत्र्यांनी घोषणा केली. तसेच त्यांना अटक करण्याची मागणीही फडणवीसांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आत्महत्या, मृत्यू झाल्यावर दखल घेणे हे सरकारचे काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नावेही लिहिलेली आहेत. जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास करणे सुरू आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. अशी सरकारची पद्धत नसते. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचे आणि चारित्र्यहनन करायचे, हे आम्ही नाही करणार. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एवढे होऊनही मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली आहे. सचिन वझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असल्यासारखे चित्र निर्माण केले जात आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवली जाणार नाही.’ सचिन वझे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.


Back to top button
Don`t copy text!