धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेचे ‘अहिल्यादेवी होळकर आवास योजना’ नामकरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 9 : ‘भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना’ या योजनेचे नामकरण आता ‘अहिल्यादेवी होळकर आवास योजना’ असे करण्यात आले आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

वडेट्टीवार यावेळी म्हणाले, अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष, दानशूर, कर्तृत्ववान, सुधारणावादी, कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. त्या युद्धकुशल, श्रेष्ठ मुत्सद्दी न्यायप्रिय शासक होत्या. त्यांनी अनेक घाट, विहिरी, मंदिरे, धर्मशाळा, पाणपोई यांची बांधणी केली तसेच अन्नछत्राची उभारणी केली. सर्वधर्मसमभावाची जपणूक करत स्त्रियांचा मानसन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी वस्त्रोद्योग, कुटिरोद्योगास चालना दिली. असे अनेक महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या आणि सर्वच राज्यकर्त्यांच्या प्रेरणास्थान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजहिताच्या, न्यायाच्या शिकवणुकीला समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ना. वडेट्टीवार यावेळी म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!