नामदेवराव जाधव यांचे निधन


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२२ । सातारा । सातारा येथील कबड्डीपटू मनोज जाधव यांचे वडिल नामदेवराव बयाजी जाधव (८५) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास सातारा येथे दुःखद निधन झाले.
आज संध्याकाळी साधारण सायंकाळी सहा वाजता संगममाहुली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले , सुना , विवाहित मुलगी ,  नातवंडे असा परिवार आहे.
नामदेवराव जाधव ( आप्पा ) हे सातारा येथील श्री शिवाजी उदय मंडळाचे जुने खेळाडू व कबड्डीपटू. सातारच्या आयुर्विमा महामंडळात त्यांनी नोकरी केली. त्या कालावधीत त्यांनी इंटक तसेच विमा कामगार संघटना यातही सक्रिय सहभाग नोंदवला. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. विशेष म्हणजे नामदेवराव जाधव यांचा आजच वाढदिवस होता


Back to top button
Don`t copy text!