डॉ.हेमंत मगर यांच्या सुश्रुत हॉस्पिटलला ‘एनएबीएच’ ची मान्यता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण दि.२२: येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.हेमंत मगर यांच्या सुश्रुत हॉस्पिटलला नैशनल एक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स एंड हेल्थ केयर म्हणजेच एनएबीएचची मान्यता मिळाली आहे. रुग्णालयाच्या गुणवत्तेच्या निकषांवर आधारीत ही मान्यता आहे.

एनएबीएच हे भारतीय गुणवत्ता समितीचे एक घटक मंडळ आहे. जे आरोग्य सेवा संस्थांसाठी अधिकृतता कार्यक्रम स्थापित करण्यासाठी आणि चालविण्यासाठी कार्यरत आहे. गुणवत्तापूर्ण उपचार व सुविधांच्या निकषांवर ही भारतातील रूग्णालयांची मुख्य मान्यता आहे.

गेल्या 32 वर्षांपासून सुश्रुत हॉस्पिटल फलटणमध्ये कार्यरत आहे. या ठिकाणी डॉ.हेमंत मगर यांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक अस्थिव्यंग उपचाराचा 32 वर्षाचा प्रदिर्घ अनुभव आहे. डॉ.हेमंत मगर यांनी पंधरा वर्षात 1000 हून अधिक कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. 3000 हून अधिक मणक्याच्या शस्त्रक्रिया तर 4500 हून अधिक ऑर्थोस्कोपी करण्याचा अनुभव देखील डॉ.हेमंत मगर यांना आहे. सुश्रृत हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नवीन, अत्याधुनिक उपचार प्रणाली, खांदा, गुडघा व घोटा सांध्यांच्या आजाराची दुर्बिणीतून तपासणी व शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग उपचारामध्ये खांदा, गुडघा व खुब्याच्या सांध्यांची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने केली जाते. याच सर्व गुणवत्तांची दखल घेवून हॉस्पीटलला ही मान्यता मिळाली आहे. 

दरम्यान या यशाबद्दल सुश्रृत हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.हेमंत मगर, डॉ.सौ.मीरा मगर, डॉ.सुमेध मगर यांचे वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!