सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘माय लेकराची भेट’; फलटण येथील घटना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण परिसरात बेघर, बेवारस स्थितीत एक ६५-७० वर्षांच्या आजी ऊन, पावसात भटकताना तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, धनंजय ढमाळ यांना आढळून आली असता त्यांनी ‘गोखळी मनोबल आसरा फाऊंडेशन टीम’चे राजू गावडे-पाटील यांना मोबाईलवरून संपर्क साधत संबंधित आजीची माहिती दिली.

त्यानंतर मनोबल आसरा फाऊंडेशन टीमचे राजू गावडे-पाटील आणि हणमंत खलाटे यांनी तातडीने हालचाल करत त्या आजीपर्यंत पोहोचले. संबंधित आजीची माहिती घेतली असता, आपले नाव लतिका आणि राहणार महंमदवाडी (पुणे) आहे, असे तिने सांगितले. त्या आजीला त्वरित फलटण शहर पोलिस स्टेशनला जाऊन कॉन्स्टेबल धायगुडे आणि लोंढे यांच्या सहकार्याने मराठा लाईफ फाऊंडेशन संचलित ‘आई वृध्दाश्रमा’चे व्यवस्थापक अध्यक्ष देवीदास लोखंडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर त्या बेवारस आजींना संस्थेत दाखल केले.

या आजीचे नाव लता मेघराज आल्हाट (रा. महंमदवाडी, पुणे) असून ती पंढरपूर रोडवर (फलटण) सापडल्यानंतर ‘आई अनाथाश्रम, मलटण येथे दाखल करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ दहा-बारा दिवस सोशल मीडियावर फिरत असताना तो संबंधित आजींच्या नातेवाईकांनी पाहिला. हरवलेल्या आजी दुसर्‍या तिसर्‍या कोण नसून आपलीच आई असावी म्हणून तातडीने आजीचा मुलगा, सून यांनी फलटण गाठले. त्यांनी सांगितले की, आई तीन महिन्यांपूर्वी घरातून निघून गेली होती. आम्ही खूप शोध घेतला; परंतु सापडली नाही.

मनोबल आसरा फाउंडेशन टिमशी संपर्क साधत आपली आईच असल्याचे मुलगा मयूर मेघराज आल्हाट, मुलगी, सून यांच्याकडे खात्री करून आजींना ताब्यात दिले. आजीचा मुलगा, सून, मुलगी यांनी यावेळी मनोबल आसरा फाउंडेशन टिमचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!