
स्थैर्य, वावरहिरे, दि.१: शासनाच्या 25 सप्टेंबर च्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात उपस्थितीतून सूट देण्यात आली असून सातारा जिल्ह्यात अजूनही पूर्ण क्षमतेने वाहतूक व्यवस्था सुरळीत न झाल्यामुळे दिव्यांग कर्मचारी यांना उपस्थितीतून सूट मिळावी . दिव्यांग कर्मचारी यांची रोग प्रतिकार शक्ती इतरांच्या तुलनेत तितकीशी चांगली नसल्याने कुटुंबाना भेटी दिल्याने कोरोनामुळे दिव्यांग कर्मचारी बाधित होण्याची अधिक शक्यता आहे. माझे कुटुंब ,माझी जबाबदारी कुटुंब सर्वेक्षण या कामातून 55 वर्षे वयाच्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने सूट दिली आहे.दिव्यांग कर्मचारी यांची असमर्थता लक्षात घेऊन जनगणना सारख्या महत्वाची कामातून यापूर्वीच दिव्यांग कर्मचारी यांना वगळले आहे. त्याच धर्तीवर या कामातुन शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना सुट देण्याबाबतचे निवेदन सातारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असल्याची, माहिती अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव अवघडे यांनी दिली.