फलटणमध्ये भरदिवसा तरुणाचा खून; रात्री उशिरा गुन्हा नोंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण शहरातील श्रीराम मंदिराच्या जवळ टोपी चौक येथे निलेश हिरालाल चव्हाण व भरत फडतरे यास मुलींची छेड का काढतो असे म्हणून सलील शेख यांनी लोखंडी तलवारीने, सैफुल्ला शेख व जमीर शेख यांनी लोखंडी पाईपने तर बिलाल व इतर अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत गंभीर जखमी केले. यामध्ये निलेश हिरालाल चव्हाण याचा मृत्यू झाला तर भरत फडतरे हा गंभीर जखमी झालेला आहे. म्हणून याबाबतचा गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरुवार दि. १३ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून तीस मिनिटांनी दाखल करण्यात आलेला आहे. फलटण शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी खुनाची घटना घडल्याने शहरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी पाहणी केलेली आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि, फलटण शहरातील श्रीराम मंदिराच्या जवळ टोपी चौक येथे निलेश हिरालाल चव्हाण व भरत फडतरे यास मुलींची छेड का काढतो असे म्हणून सलील शेख यांनी लोखंडी तलवारीने, सैफुल्ला शेख व जमीर शेख सर्व रा. कुंभार टेक, फलटण यांनी लोखंडी पाईपने तर बिलाल व इतर अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत गंभीर जखमी केले. यामध्ये निलेश हिरालाल चव्हाण याचा मृत्यू झाला तर भरत फडतरे हा गंभीर जखमी झालेला आहे. म्हणून याबाबतचा गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये सौ. कांता हिरालाल चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार दाखल करण्यात आलेला आहे. याबातच पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत किंद्रे करीत आहेत.

सदरील गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर पाचव्या आरोपीला सुद्धा लवकरात लवकर अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी पाहणी करताना दिली.


Back to top button
Don`t copy text!