फलटण बसस्थानकाअंतर्गत वास्तवास असलेल्या भिकारी महिलेचा खून; संशयीत आरोपीस अटक


 

फलटण : घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस उप-अधिक्षक डॉ. निलेश देशमुख, पो. नि. प्रताप पोमण, पोलीस उपनिरीक्षक बनकर व अन्य

स्थैर्य, फलटण, दि.२: फलटण बसस्थानकाअंतर्गत असलेल्या बारामती स्थानकातच वास्तवास असलेल्या ५० ते ५५ वयाच्या भिकारी महिलेचा खून करण्यात आला आहे. या घटनेतील संशयीत आरोपीस जागेवर पकडण्यात आले आहे. अविनाश रोहिदास जाधव रा. संतोषीमाता नगर, मलठण असे त्याचे नाव आहे.

दरम्यान सदर संशयीताने हे कृत्य दारुच्या नशेत केले असून संमंधीत महिलेवर त्याने अतिप्रसंग केला असण्याची शक्यताही घटनास्थळावरुन व्यक्त होत होती.

याबाबत माहिती अशी की, फलटण बसस्थानकाअंतर्गत बारामतीस जाण्यासाठी छोटेखानी बसस्थानक आहे. या ठिकाणी अॉफिस व लगतच प्रवाशांसाठी बसण्यासाठीचे शेड आहे. कोरोना संसर्गामुळे बसेस व प्रवाशी संख्या फारशी नसल्याने या ठिकाणी फारशी वर्दळ नसते. या शेडमध्येच सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास आहे. तीला चालता येत नसल्याने येणार्या जाणार्या प्रवाशांकडून मागून घेवून तीचा उदरनिर्वाह सुरु होता. आज दि. २ रोजी सकाळी सातच्या सुमारास बसस्थानकातील सुरक्षा रक्षक दत्तात्रय सोनवलकर हे बसस्थानकातील लाईट बंद करीत होते. ते बारामती स्थानकातील लाईट बंद करण्यासाठी आले असता, त्यांना तेथील प्रवाशांसाठी असलेल्या शेडमध्ये एका बाकावर एक २५ ते ३० वयोगटातील इसम अर्धनग्न प्यान्ट न घातलेल्या स्वरुपात झोपला असल्याचे व बाकाखाली फरशीवर ५० ते ५५ वयोगटातील महिला पालथ्या अवस्थेत व अर्धनग्न अवस्थेत पडलेली दिसून आली. सदर महिलेच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येत होते. सोनवलकर यांनी हाका मारल्या परंतू त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. या नंतर सदर प्रकाराची कल्पना त्यांनी आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांना दिली. धुमाळ हे सोनवलकर यांच्यासमवेत गेले असता तेथे त्यांना 

संशयीत अविनाश जाधव यास तो पळून जाण्याच्या तयारीत असताना काहींनी त्यास पकडून ठेवले होते. त्यावेळी त्याच्या प्यान्टवरती रक्ताचे डाग होते. त्याची विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव व पत्ता सांगितले. सदर प्रकाराची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी केलेल्या पाहणीत संबंधित महिलेच्या आजूबाजूस रक्ताचे डाग होते. तिच्या तोंडावर मार लागलेला होता. तीला फरशीवर आपटून अथवा हत्याराने केलेल्या मारहाणीत तीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले. 

दरम्यान सदर घटनास्थळास दुपारी पोलीस उप-अधिक्षक डॉ. निलेश देशमुख यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथकातील श्वानास तेथे सापडलेल्या कपड्यांचा वास देण्यात आल्यानंतर ते घटनास्थळावर आणलेल्या संशयीत अविनाश जाधव याच्या जवळ घुटमळले. घटनास्थळी पोलीसांना संशयीताच्या कपड्यासह दारुची बाटली, पेला, डिश आदी साहित्य मिळून आले. सदर घटनेची तक्रार दत्तात्रय सोनवलकर यांनी दिली आहे. पुढिल तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण हे करीत आहेत.

फलटण : घटनास्थळी पाचारण करण्यात आलेले श्वान पथक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!