दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२१ । सातारा । म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत दि. 7 रोजी सायंकाळी एका पाच वर्षाच्या मुलाचा अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा एलसीबीच्या पथकाने जलद तपास करून दोन तासात गुन्ह्याचा छडा लावला व एका पंधरा वर्षाच्या बालकास ताब्यात घेतले.
याबाबत माहिती अशी, दि. 7 रोजी सायंकाळी 6 ते 7 च्या सुमारास म्हसवे, ता. सातारा गावातील एका घरामध्ये 5 वर्षाचा मुलगा विघ्नेश दत्तात्रय चोपडे याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता खून केल्याचे आढळून आले. याप्रकरणी दत्तात्रय दादासो चोपडे, वय 31 वर्षे मूळ रा. खुटबाव, ता. माण सध्या रा. म्हसवे, ता. जि. सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे, कोरेगाव विभाग चार्ज सातारा विभाग, किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. 5 वर्षाच्या मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने खुन केलाही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना नमुद गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोनि किशोर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे व पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले. या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील साक्षीदार यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल विचारपूस करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. गणेश कापरे , मोहन पवार , पो.कॉ. रोहित निकम, वैभव सावंत यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की , घटनास्थळ असलेल्या घराशेजारील एका विधी संघर्षग्रस्त बालकाने मयत विघ्नेश दत्तात्रय चोपडे याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचे उद्देशाने घटनास्थळावर घेवून जावून त्याचा खून केला आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर उपनिरीक्षक गणेश वाघ व त्यांच्या तपास पथकाने नमुद विधी संघर्षग्रस्त बालकास तात्काळ ताब्यात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण व खपींशीीेसरींळेप डज्ञळश्रश्र (Interrogation Skill ) चा वापर करुन चौकशी केली. यानंतर संशयित अल्पवयीन आरोपीने त्या बालकाचा खून अनैसर्गिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने केला असल्याचे सांगीतले.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे यांच्या सूचनाप्रमाणे व एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो. ना. मुनीर मुल्ला, गणेश पो. कॉ. रोहित निकम, वैभव सावंत, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, अमित पाटील, पो. हवा. दादा परिहार, पो. ना. नितीराज थोरात, मालोजी चव्हाण, सतिश पवार यांनी ही कारवाई केली.