दारु पिण्यास पैसे न दिल्याने बरड येथे एकाचा खून

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि.18 : बरड ता.फलटण येथे दारु पिण्यासाठी पैसे का देत नाही यावरुन झालेल्या भांडणात एकाचा खून झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,  बरड ता फलटण येथील पालखी तळ येथे असणारे महादेव मंदिराशेजारीचे शेजारी दुपारी 02.00 वाजण्याच्या सुमारास सभामंडपात बसणेसाठी गावातील खगन पांडुरंग जाधव , अमर गावडे इत्यादी लोक बसले होते. शेजारीच हायस्कुलचे समोर असणारे लिंबाखाली गावातील संजय सोपान पोरे हा बसला होता. त्यावेळी दुपारी 03.00 वाजण्याच्या सुमारास बरड गावातुन सागर पोपट लोंढे, सावकार नामदेव लोंढे व बाळु नामदेव गावडे असे पायी चालत येवुन सभामंडपात बसले होते. त्यावेळी त्यांचेत सायंकाळी 04.30 वा सुमारास त्याचेत वाद होवुन भांडण सुरु झाली त्यावेळी सागर लोढे व सावकार लोंढे यांनी बाळु नामदेव गावडे यास तु आम्हाला दारु पिण्यास पैसे का देत नाही, असे म्हणुन त्यास हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करु लागली. त्यावेळी सागर लोंढे याने सभामंडपाचे शेजारी पडलेले लाकडाने बाळु गावडे यांचे डोक्यात जोराने दोन ते तीन वेळा मारुन गंभीर जखम झाल्याने त्यांचे डोक्यातुन रक्त आले. तसेच सावकार लोढे हा सुध्दा फरशीचे तुकडयाने व विटेचे तुकड्याने बाळु गावडे यास फेकुन मारहाण करीत होता. सदर भांडणात बाळु नामदेव गावडे याचे डोक्यात गंभीर दुखापत होवुन त्यातुन रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मयत झालेने ते दोघे तेथुन पळुन गेले आहेत. याबाबत बरड पोलिस दुरक्षेत्रात अशोक शंकर गावडे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय बोंबले करत आहेत. अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!