दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेच्या भारतरत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामधील शॉपिंग सेंटरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर असे नाव देण्यात आले असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
यामध्ये मुख्याधिकारी तथा प्रसासक संजय गायकवाड यांनी असे स्पष्ट केले आहे की, फलटण नगरपरिषदेच्या मंजूर विकास आराखडयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे बाजूस असलेल्या जुन्या शॉपिंग सेंटरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर व मुधोजी हायस्कुल कडील बाजुस राजा मुधोजी शॉपिंग सेंटर अशी नावे नगरविकास विभागाच्या शासन निर्णयाच्या अभिलेख्यामध्ये नमूद आहेत. नविन प्रशासकीय इमारतीस महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर इमारत नवीन शॉपिंग सेंटर इमारतीस राजधानी टॉवर्स असे नाव असल्याचे नगरपरिषद व शासनाच्या अभिलेख्यामध्ये नमूद आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर फलक खराब व जीर्ण झालेला असलेने सदरचे नाव स्टील अक्षरांमध्ये करण्यासंदर्भात नगरपरिषदे मार्फत कार्यवाही चालू होती. तथापी कारागीर आजारी असल्याने त्यास विलंब लागणार असल्याने व संघटनेच्या व नागरीकांच्या तीव्र भावना असल्याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर नावाचा तात्पुरत्या स्वरुपाचा बोर्ड नगरपरिषदे मार्फत आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर या नावाची स्टिल अक्षरे बसविणे बाबतच्या कामाची कार्यवाही नगरपरिषदेमार्फत लवकरच करण्यात येणार आहे, असेही मुख्याधिकारी तथा प्रसासक संजय गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.