नगरपालिकेची सभा बेकायदेशीर घोषित करावी – सुशांत मोरे


स्थैर्य, 17 जानेवारी, सातारा : नगरपालिकेच्या तब्बल 9 वर्षानंतर निवडणुका झाल्या. त्यानंतर झालेली पहिलीच सर्वसाधारण सभा बेकायदेशीर आहे. ही सभा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे उल्लंघन करणारी असून सभेबाबतची चौकशी होवून ही सभा बेकायदेशीर घोषित करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी संतोषपाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपाध्यक्षपदाची निवडणूक, नामनिर्देशन, नगरपरिषदेने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पध्दत, विषय समितीची सदस्य संख्या व उपाध्यक्ष ज्या समितीचे पदसिद्ध सभासद असतील, याबाबत 22 जानेवारीची सभा पार पडली. ती बेकायदेशीर असून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कायद्याचे उल्लंघन करणारी झालेली आहे. यामध्येनागरिकांना, सदस्यांना अंधारात ठेवून, अर्ज स्वीकारणे, अर्ज कोठे व कधी देणे याबाबत मुद्दाम संदिग्धता ठेवलेली आहे.

त्यामुळे नगरपरिषदेची पार पडलेली सर्वसाधारण सभा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे उल्लंघन करणारी असून सभेबाबतची चौकशी होवून बेकायदेशीर सभा घोषित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विभागीय आयुक्त पुणे यांना देण्यात आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!