दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । फलटण । दि. ०२ आँक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना गजानन चौकातील महात्मा गांधींचा नुतनीकरणासाठी काढलेला पुतळा लवकरात लवकर बसवावा, अशी आग्रही मागणी केलेली होती. अन्यथा आगामी काळामध्ये गांधीजींच्या दाखवलेल्या मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेला होता. याचीच दखल घेत फलटण नगरपरिषदेने गजानन चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे नूतनीकरणाचे रखडलेले कामकाज सुरु केलेले आहे, असे मत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी व्यक्त केलेले आहे.
फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कार्याध्यक्ष अमिरभाई शेख, शहर अध्यक्ष पंकज पवार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रितम जगदाळे, अनूसुचित जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर, अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष ताजूभाई बागवान, शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दिपक शिंदे तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी शरद सोनवणे, अच्युत माने, अभिजित जगताप, नितीन जाधव, अनिल खोमणे, चंद्रकांत पवार, जालिंदर गायकवाड, सोपानराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना सविस्तर निवेदन देण्यात आलेले होते. त्याचीच दखल घेत सदरील कामकाज सुरु केलेले आहे, असेही तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी स्पष्ट केले.