स्थैर्य, मुंबई, दि. १३: मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटने नशेच्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत दोन लोकांना 18 क्विंटल गांजासह अटक केली आहे. विशेष म्हणजे गांजा नारळामध्ये लपवून सप्लाय केला जात होता. त्यांच्याकडून एक टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गांज्याची किंमत जवळपास साडे तीन कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
मुंबई पोलिसांचे जॉइंट कमिश्नर (CP)मिलिंद भारंभे यांनी सांगितले की, ‘घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई ठाणे महामार्गावर सापळा रचून टेम्पोचा पाठलाग केला आणि नारळाने भरलेला ट्रक पकडला. आरोपींनी वेगवेगळ्या नारळांमध्ये 18 क्विंटल गांजा लपवला होता.
बचाव करण्यासाठी प्रत्येकवेळी नव्या ऑटोचा करत होते वापर
मिलिंद भारंभे यांनी सांगितले की, या प्रकरणात आकाश यादव आणि दिनेश सरोज नावाच्या दोन लोकांना अटक केली आहे. हे ओडिशाच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधून गांजा आणून महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागात पाठवत होते. आरोपींजवळून जप्त करण्यात आलेला टेम्पो काही दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आला होता. आरोपी प्रत्येकवेळी नवीन टेम्पोचा वापर करत होते.
मुंबईमध्ये दर महिन्यात 4 क्विंटल गांजा विकला जात होता
मिलिंद यांनी सांगितल्यानुसार, दोन्ही आरोपी प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रात 6 टन गांजा सप्लाय करत होते आणि 4 टन गांचा केवळ मुंबईमध्येच विकला जात होता. पोलिस आता मुख्य गुंड संदीप सातपुते आणि लक्ष्मी प्रधान याचा शोध घेत आहेत. सातपुते हा मागील 5 वर्षांपासून गांजा पुरवठ्याशी संबंधित आहेत. त्याला बर्याचदा अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या लुईसवाडी येथे राहणाऱ्या सातपुते यांचे भिवंडी भागात गोडाऊन आहे. तो मुंबई, ठाणे आणि आजुबाजूच्या भागात गांजा सप्लाय करतो.
ओडिसामधून असा येत होता गांजा
पोलिसांनुसार ओडिसामधून हा गांजा सप्लाय केला जातो. ओडिसामधील लक्ष्मी प्रधान नावाची व्यक्ती हा गांजा सप्लाय करत होती. ओडिसामधून जो ड्रायव्हर टेम्पो घेऊन महाराष्ट्राकडे येतो. त्याचा मोबाइल लक्ष्मी प्रधान यांचे लोक घेतात आणि मध्येच ड्रायव्हरही बदलून देतात. जेव्हा हा टेम्पो ओडिसामधून महाराष्ट्रासाठी निघतो. त्या दरम्यानही रस्त्यात अनेक ठिकाणी गांज्याचा सप्लाय केला जात होता.