निंभोरेत मुकुंद रणवरे विजयी; अमित रणवरे पराभूत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, वृत्तसेवा दि.18 : फलटण तालुक्यातील निंभोरे ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणूकीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक मुंकद रणवरे विजयी झाले आहेत. तर माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्‍वासू कार्यकर्ते अमित रणवरे हे पराभूत झाले आहेत.

निंभोरे गावात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची स्वराज डेअरी कार्यरत असताना अमित रणवरे यांच्या रुपाने ग्रामपंचायतीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व होते. मात्र स्वराज डेअरीच्या हस्तांतराचा फटका या निवडणूकीत अमित रणवरे यांना बसला असल्याची चर्चा निकालाअंती होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!