मुधोजी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घातले ‘सामूहिक सूर्यनमस्कार’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
‘वंदन करा सूर्याचे अन् धडे गिरवा सकाळ स्वास्थ्यमचे’ हे घोषवाक्य घेऊन सकाळ माध्यम समूहाच्या वतीने व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या माध्यमातून मुधोजी हायस्कूल फलटण येथे शनिवार, दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ हा सकाळ माध्यम समूहाचा उपक्रम राबविण्यात आला.

या दिवशी सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी २००० पेक्षा जास्त शाळांमधून सामूहिक सूर्यनमस्कार घालून हा कार्यक्रम राबविण्यात आला. सकाळतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन व नवीन स्पर्धा असे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते व आपल्या सहकार्याने या सर्व उपक्रमांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, असे सकाळचे प्रतिनीधी सचिन फडतरे यांनी यावेळी सांगितले.

सामूहिक सूर्यनमस्कार हा उपक्रम राबवताना समाजातील सर्व वयोगटासाठी अत्यंत उपयुक्त असून आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीवर जाणे, उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमविणे आणि काही काळ आराम करण्याच्या पलीकडे सर्वसामान्य लोक काही जादा करत नसल्याचे पाहावयास मिळते. वास्तविक लहानपणापासून सूर्यनमस्कार घालण्याची सवय राहिल्यास वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहता येते व आपले स्वास्थ्य चांगले ठेवता येते, असे प्रतिपादन यावेळी मुधोजी हायस्कूलचे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे यांनी केले.
यावेळी सूर्यनमस्कारातील आसने योगा मार्गदर्शक वाघ सर यांनी करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून ते करून घेतली व सूर्यनमस्कारांचे महत्त्व सांगितले. यावेळी विद्यार्थांनी प्रणामासन, हस्त उत्तानासन, उत्तानासन, अश्व संचालनासन, चतुरंग दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्व संचालनासन, उत्तानासन, हस्त उत्तानासन, प्रणामासन असी आसने विद्यार्थ्यांनी केली.

या कार्यक्रमास मुधोजी हायस्कूलच्या स्टाफ सेक्रेटरी सौ. लतिका अनपट, सौ. टि. व्ही. शिंदे , सौ. एस. डी. घोरपडे, सौ. एस. बुचडे, सौ. ए. ए. नाईक निंबाळकर, रामदास माळवे, श्रीगणेश कचरे, एस. अभंग, डी. एम. मोहिते, अमोल सपाटे, सागर भोईटे, एस. गोंधळी, अमोल नाळे इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आभार सौ. लतिका अनपट यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!