मुधोजी महाविद्यालयास व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद


दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विभागीय जिल्हास्तरीय स्पर्धा २०२३-२४ डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कराड येथे संपन्न झाल्या. या सातारा विभागीय व्हॉलीबॉल महिला स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयास विजेतेपद मिळाले.

बादफेरीच्या स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने महिला महाविद्यालय कराड, वेणूताई चव्हाण कॉलेज कराड, शहाजीराजे महाविद्यालय खटाव या संघावर सरळ सेटमध्ये विजय मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आणि विजेतीपदाची हॅट्ट्रीक साजरी केली. या संघामध्ये श्रद्धा शिंदे, अर्पिता गायकवाड, वैष्णवी फडतरे, साक्षी गायकवाड, श्रद्धा निंबाळकर, शिवानी शिंदे, साक्षी शिंदे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघाचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!