युवा महोत्सवामुळे तणावमुक्ती आणि सर्जनशीलतेला मिळणार बळ; मुधोजी महाविद्यालयात उत्साहात उद्घाटन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मुधोजी महाविद्यालयात आयोजित ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी प्रा. डॉ. ज्योती जाधव यांनी युवा महोत्सवाचे महत्त्व विशद केले.

स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑक्टोबर : विद्यार्थ्यांच्या बदलत्या वातावरणातील तणावमुक्ती, सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्तीला शास्त्रीय अधिष्ठान देण्याचे काम युवा महोत्सव करतो, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव यांनी केले. फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

विविध क्षेत्रांतील तणावातून मुक्त होऊन आनंदी जीवन जगणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत जाधव म्हणाल्या, “विद्यार्थी क्रमिक अभ्यासासोबत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि विविध कौशल्यांना सामोरे जात आहेत. अशा वेळी संगीत, नृत्य, नाटक व वक्तृत्व यांसारख्या कलाप्रकारांमुळे आत्मविश्वास वाढून व्यक्तिमत्त्व विकासाला गती मिळते.”

अध्यक्षीय मनोगतात फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना कला व संस्कृतीसाठी संधी मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. या महोत्सवासाठी एकूण ३,३६४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने परिसर भारावला

६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात ४२ विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी कौशल्य सादर करणार आहेत. कार्यक्रमास प्राचार्य पी. एच. कदम, विद्यार्थी विकास विभागाचे प्र. संचालक एस. जी. घाणे, समन्वयक टी. पी. शिंदे, अशोक शिंदे, अरविंद निकम, अशोक दोशी, रवींद्र बेडकिहाळ यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!