दैनिक स्थैर्य । 29 नोव्हेंबर 2024 । फलटण । श्रीमती मीनलबेन मेहता महाविद्यालय, पाचगणी येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय मैदानी पुरुष व महिला स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने 4X100 मी.रिले धावणे क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक, 4X400 मी.रिले धावणे या क्रिडा प्रकारात तृतीय क्रमांक संपादन केला. यामध्ये रसिका मोहिते, पूर्व खानविलकर, शिवानी निंबाळकर, स्नेहल गुंजाळ, पूजा फडतरे, तुळसा शिंदे, कोमल शिंदे यांनी सहभाग घेतला.
तसेच 200 मी.धावणे या क्रीडा प्रकारात गणेश काशीद याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 100 मी.धावणे या क्रीडा प्रकारात गणेश काशीद याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. लांबउडी या क्रीडा प्रकारात आनंद चव्हाण याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.