महवितरणचे नवीन वीज मीटर कचराकुंडीत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. 04 : राहुरी तालुक्‍याच्या देवळाली प्रवरा येथील सोसायटी चौकात पत्र्याच्या टपरीमागे महवितरणचे 25 नवीन वीज मीटर टाकून दिल्याचे आढळून आले. एकीकडे नवीन वीज मीटरसाठी ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागत असताना नवीन 25 मीटर फेकून दिल्याचे आढळल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व त्यांचे श्रीरामपूर येथील एक मित्र देवळाली प्रवरा येथील सोसायटी चौकात उभे असताना ढुस यांचे या मीटर पडलेल्या जागेकडे लक्ष गेले. जवळ जावून पाहिले असता ते महावितरण कंपनीचे नवीन वीज मीटर असल्याचे आढळले. ढुस यांनी मुख्य अभियंता सांगळे यांना फोन करून माहिती दिली.

सांगळे यांनी तात्काळ देवळाली प्रवराचे उपअभियंता देहरकर यांना घटनास्थळी पाठवून सर्व मीटरची तपासणी करून पंचनामा केला. पंचनामा करताना एकूण 25 नवीन मीटर आढळून आले. या सीरियल क्रमांकाचे नविन मीटर कार्यालयातून कोणी, कधी व कशासाठी ताब्यात घेतले होते, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे प्रदीप देहरकर यांनी सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!