दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । फलटण । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या फलटण तालुका ठेकेदार संघटनेच्या ऑगस्ट 2021 पासून अनेक बिले प्रलंबित आहेत. सध्या व्यवसायामधील कच्च्या मालाची किंमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या व्यवसायामधील कच्च्या मालाची किंमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तीन वर्ष झाले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून कोणतीही दरवाढ देण्यात आलेली नाही. तरीसुद्धा ठेकेदार हे जुन्या दरानेच काम करीत आहेत. ऑगस्ट 2021 पासून कोणताही निधी अदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्व ठेकेदारांनी दि. 20 फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे.
महावितरणचे फलटणचे कार्यकारी अभियंता गणेश जमाले यांना फलटण तालुका विद्युत ठेकेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे सविस्तर निवेदन दिले.
यावेळी साईराम इंजिनिअरींगचे विठ्ठल नाळे, न्यु स्टार इलेक्ट्रीकल्सचे प्रविण कोल्हे, वंश इलेक्ट्रोनिक्स विशाल कणसे, झणझणे इलेक्ट्रीकल्सचे वैभव झणझणे, शिवतेज इलेक्ट्रीकल्सचे डी. के. जाधव, संतोष इलेक्ट्रीकल्सचे डी. बेंद्रे, सिध्देश्वर इलेक्ट्रीकल्सचे एम. जाधव, अल्फा इलेक्ट्रीकल्सचे एस. मेटकरी, श्रेया इलेक्ट्रीकल्सचे एम. जे. भागवत, विजयलक्ष्मी इलेक्ट्रीकल्सचे एन. ए. काळुखे यांच्या स्वाक्षरीने महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश जमाले यांना निवेदन देण्यात आले.