राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची कु.माधुरी ननावरे द्वितीय


स्थैर्य, फलटण दि.५ : महाराष्ट्र राज्य कनिष्ठा महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थी कु.माधुरी महेंद्रकुमार ननावरे हिनी द्वितीय क्रमांक पटकावला.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघातर्फे राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यामध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक – जाधव अनिकेत गोरख, द्वितीय क्रमांक – ननावरे माधुरी महेंद्रकुमार व तृतीय क्रमांक – बर्गे श्रुती अनिल यांनी मिळवला.

यानंतर झालेल्या विभागीय स्पर्धेत जाधव अनिकेत गोरख व ननावरे  माधुरी महेंद्रकुमार यांनी यश संपादन करुन त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.  यानंतर झालेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत कु. ननावरे माधुरी महेंद्रकुमार हिचा या द्वितीय क्रमांक आला.

या विद्यार्थ्यांना प्रशालेतील हिंदी अध्यापिका सौ. लोणकर यांनी मार्गदर्शन केले.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ चेअरमन तथा बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, प्रशालेचे प्राचार्य के.बी. खुरंगे, उपप्राचार्य एस.सी.अहिवळे व कनिष्ठ विद्यालय विभागप्रमुख एम.के.फडतरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!