
स्थैर्य, फलटण दि.10 : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लायनेस क्लब ऑफ फलटण (आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना डिस्ट्रिक्ट-3234 डी 1) यांच्यावतीने ’सन्मान तेजस्विनीचा’ या कार्यक्रमाअंतर्गत गोखळीच्या सौ.शोभा राजेंद्र भागवत यांना ‘आदर्श माता पुरस्कारा’ने लायन बापूराव जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी फलटण नगरपालिका बांधकाम सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या जनरल सेक्रेटरी सौ.वसुंधराराजे नाईक निंबाळकर, लायनेस क्लब अध्यक्षा सौ.निलम लोंढे पाटील, सौ.नेहा व्होरा, सौ. सुनंदा भोसले, रिझन चेअरमन बाळासाहेब भोंगळे, डिस्ट्रिक चेअरमन मंगेशशेठ दोशी, भोजराज निंबाळकर, डॉ.अशोक व्होरा, मनुभाई पटेल, रणजित बर्गे, ह.भ.प.एस.एम.घाडगे महाराज, ह.भ.प.पुष्पाताई कदम, फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती लतिका अनपट, तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सौ.राजश्री कदम, सविता दोशी, राजीव निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विरपत्नी, वीर माता, कोव्हिड योध्दा, आदर्श व्यवसायिका, आदर्श महिला वकील, आदर्श व्यवसायिका, आदर्श शिक्षिका, आदर्श माता आदी पुरस्कार, सन्मानपत्राचे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.हेमलता गुंजवटे यांनी केले.
आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देऊन उच्च शिक्षित केले व कोरोना संसर्ग साथीच्या काळात आरोग्य कर्मचारी बरोबर घरोघरी जाऊन कुटुंब सर्व्हेक्षण केले. याबद्दल सौ.शोभा भागवत यांना यापूर्वी फलटण पंचायत समिती, गोखळी ग्रामपंचायतीचे वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.