दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील राजकीय वारसा असलेल्या आरडगावच्या सौ. संगीता धनंजय भोईटे यांची राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या कोअर कमिटीवरती विभागीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी यथोचित सत्कार केला.
यापूर्वीही त्यांना अनेक जिल्हा व राज्य पातळीवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासाठी त्यांना श्री. सुरेश केसकर, जिल्हाध्यक्ष श्री. अशोकराव जाधव, कामगार कल्याण मंडळ सांगलीचे श्री. घाडगे, श्री. कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माथाडी कामगार नेते आ. शशिकांत शिंदे, श्रीराम बझारचे माजी चेअरमन महादेवराव पवार, चेअरमन जितेंद्र पवार, व्हा. चेअरमन व सद्गुरू संस्था समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, फलटणच्या नगरसेविका अॅड. सौ. मधुबाला भोसले, फलटण ग्रामीण पत्रकार संघटनेचे माजी उपाध्यक्ष सुरेश भोईटे, बिल्डर असोसिएशनचे राजेंद्र कापसे, सर्व राज्य कमिटी सदस्य आदींनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)