दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण आगारात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठत आहेत. या ठिकाणी फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बस उभ्या केल्या जातात. मात्र, जाणीवपूर्वक एसटी ड्रायव्हर एसटी बस या डबक्यातच उभ्या करत असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटी बसमध्ये चढताना-उतरताना या घाणीच्या पाण्यातूनच त्यांना जावे लागत आहे. याबाबत अनेकवेळा एसटी ड्रायव्हर यांना सांगूनसुद्धा बस मुद्दाम पाण्यामध्ये उभी केली जात आहे.
या बाबीकडे आगारप्रमुखांनी लक्ष देऊन तात्काळ चालकांना याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.