खासदार श्रीमंत छ. उदयनराजे व आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या चुलती श्रीमंत छ.सौ.चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन


 

स्थैर्य, सातारा, दि.१३: जघराण्यातील स्नुषा श्रीमंत छ. सौ. चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज (रविवार) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. येथील अदालत राजवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते. माजी नगराध्यक्ष श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले यांच्या त्या पत्नी होत. महिला मंडळाची शाळा, विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. सातारा शहरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असतं. सातारा येथील श्री राम कृष्ण सेवा मंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ सेवा बजावली होती.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर सातारा व पुणे येथील रुग्णांलयामध्ये उपचार सुरु होते.

काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांच्यावर अदालत राजवाडा येथेच उपचार सुरु होते. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. श्रीमंत छ. सौ. चंद्रलेखाराजे भोसले या खासदार श्रीमंत छ. उदयनराजे व आमदारश्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या चुलती होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सामाजिक संस्था व नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!