संक्रमित माडग्याळ जातीच्या बकर्‍याला लाखो रुपयाला मागणी


स्थैर्य, दि.१३: गटेवाडी येथील मेंढपाळ अंबाजी गणू गोरड यांना माडग्याळ जातीच्या मेंढ्या जोपासण्याचा छंद जडला आहे. त्यांनी या छंद व हौसेपोटी भांडवल गुंतवून मेंढ्याबरोबर नर मेंढा पाळला आहे़. त्यांच्याकडे असणार्‍या नर जातीच्या माडग्याळ मेंढ्याला तब्बल पाच लाखाची मागणी आली आहे. माझा बकरा विकायचा नाही असे त्यांनी सांगितले.

गटेवाडी येथील मेंढपाळ अंबाजी गोरड यांनी शेतीबरोबरच गेल्या 6 वर्षापासून माडग्याळ जातीच्या मेंढ्या पाळण्याचा छंद जोपासला आहे. त्यांनी हौसेपोटी जातिवंत माडग्याळ जातीचा नर मेंढाही जोपासला असून त्याच्या कपाळावर राघूची चोची असल्याने या मेंढ्याला मागणी आहे़ सध्या त्यांच्याकडे माडग्याळ जातीच्या लहान-मोठ्या 60 मेंढ्या आहेत. त्यांनी या मेंढ्यांनाच आपली बागायत शेती मानून वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील माण, माळशिरस, खटाव, आटपाडी, जत, कवठेमंकाळ, सांगोला, पंढरपूर आदी तालुक्यातील माडग्याळ जातीची मेंढरे पाळणार्‍याची संख्या मोठी आहे. माडग्याळ मेंढी तुलनेत गाभण काळ कमी असतो. त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीत त्या तीन वेळा वेतात. जरी मेंढ्यांची दूध उत्पादन क्षमता कमी असली तरी गाय व शेळीच्या दुधाच्या तुलनेत मेंढीच्या दुधाचे पोषणमूल्य जास्त आहे. अत्यंत कमी भांडवलातसुद्धा हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

मेंढपाळ व्यवसाय पारंपरिक असला तरी संक्रमित जातीच्या माडग्याळ मेंढ्याचे पालन केल्याने तरुण मेंढपाळांना लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता गावाकडेच मेंढपाळ व्यवसाय आधुनिक पद्धतीने केला तर पगारापेक्षा जास्त उत्पन्न हे मेंढपाळ व्यवसायातून मिळू शकते.

सागर गोरड, युवा मेंढपाळ, गटेवाडी, ता. माण.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!