दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । फलटण । फलटण शहर व तालुक्यातील गोरगरीब जनतेची फसवणूक करुन लोकांना चुना लावणार्या ‘मिस्टर नटवरलाल’ते फलटण शहर व तालुक्यात लबाड तोंडाने फिरु नये, असा इशारा अहद सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक मेहबूबभाई मेटकरी यांनी दिला आहे.
युवा नेते दिगंबर आगवणे यांनी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दिल्यानंतर मेहबूबभाई मेटकरी यांनी आगवणे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
मेहबूबभाई मेटकरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, फलटण शहर व तालुक्यातील गोरगरीब जनतेला फसवणूक करून लोकांच्या जमिनी लाटल्या, पैसे लुटले, लोकांच्या नावावर खोटी कर्ज काढली, माझ्या बंधूंना सुद्धा पैशाच्या व्यवहारांमध्ये अडकवल्याने त्यांची फसवणूक केली आहे. यामुळे माझ्या बंधूंना सुद्धा आज आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मिस्टर नटवरलाल ने असा अनेक लोकांना चुना लावला आहे. त्याने अगोदर लोकांची त्वरित देणी द्यावीत आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप थांबवावे व आपले लबाड तोंड तालुक्याला दाखवू नये, असा इशारा मेटकरी यांनी दिला आहे.