श्री. मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान चे कार्य पर्यावरण पूरक : महेश रोकडे


दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । बारामती । श्री मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान चे कार्य हरित, स्वच्छ व पर्यावरण पूरक बारामती साठी महत्पूर्ण असल्याचे प्रतिपादन बारामती नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी केले. श्री मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान व बारामती नगरपरिषद यांचे सहकार्याने मोरया नगर मध्ये महेश रोकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. जेजे शहा, ऍड रमेश कोकरे, दिलीप कापडणीस, शिवाजी जाधव, प्रमोद बुलबुले व प्रतिष्ठानचे पदाधिकारी शिवाजी सावंत, राजेंद्र आटपळकर, मुकुंद तारू, विकास देशपांडे, विकास फडतरे, ज्ञानेश्वर मांढरे, बाळासाहेब खराडे, आदित्य भातलवंडे, सुधाकर गेजगे व सौ सुजाता देशपांडे उपस्थित होते.

या प्रसंगी उद्यान विभाग चे मस्जिद पठाण, संजय गाडियाल यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही ज्येष्ठ समाज सेवेसाठी तत्पर असून बारामती हरित बनवण्यासाठी रोज तीन तास श्रमदान करून वृक्षारोपण व संगोपन करणार असल्याचे श्री मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान च्या वतीने सांगण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!