श्री. क्षेत्र जरंडेश्वर देवस्थान भाविकांना दर्शनासाठी बंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारारोड दि.२१ : सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सातारारोड- पाडळी स्टेशन, ता.कोरेगाव श्री.क्षेत्र जरंडेश्वर देवस्थान कोरोना, कोविड-१९ च्या आजारामुळे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.

श्रावण महिन्यातील दर शनिवारी श्री.क्षेत्र जरंडेश्वर येथे सातारा, सांगली, कोल्हापूर, माण,फलटण, बारामती, पुणे, निरा तसेच राज्याच्या इतर भागातून हजारो भाविक पवनपुत्र श्री.बजरंगबलीच्या दर्शनासाठी येतात. श्री.क्षेत्र जरंडेश्वर येथील डोंगरावर येण्यासाठी पाडळी,जळगाव, जांब,शिवनेरी, बोरखळ,वडूथ येथून रस्ते आहेत. कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी, सातारा यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील अनेक गावात कोविड-१९ चे रुग्ण सापडत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून श्री.क्षेत्र जरंडेश्वर देवस्थान ट्रस्ट ने होणारी गर्दी लक्षात घेता श्रावण महिन्यात तसेच त्यानंतरही होणारे सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री.क्षेत्र जरंडेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी दर्शनासाठी येणे टाळावे. श्री.क्षेत्र जरंडेश्वर डोंगरावर येणारे सर्व मार्ग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. याची सर्व भाविकांनी दखल घ्यावी असे आवाहन जरंडेश्वर देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त, पोलिस अधिकारी, ग्रामपंचायत चे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

याबाबत जरंडेश्वर देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त तानाजी काका फाळके, सातारारोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, ग्रामविकास अधिकारी डि.एल्.सुरवसे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत एक मिटिंग घेण्यात आली. श्रावण महिन्यातील शनिवारी श्री.क्षेत्र जरंडेश्वर परिसरात विनामास्क, डबलसिट आढळून आल्यास त्यांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जमावबंदी आदेशानुसार याचे कुणी उल्लंघन करतील अशा व्यक्तींंवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. चुकून कुणी जरंडेश्वर डोंगरावर जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांंच्या वर कायदेशीर कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील सर्व भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!