‘एमपीएससी’कडून सुधारित वेळापत्रक जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.८: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२०, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० या तिन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

यानुसार आता राज्यसेवा पूर्व परीक्षा – ११ ऑक्टोबर २०२०, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा – २२ नोव्हेंबर २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहेत.

आयोगाकडून यासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या परिपत्राकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा कोरोना संसर्गाच्या व लॉकडाउनच्या ऐनवेळी पुढे ढकलण्यात येऊन परीक्षांचे सुधारित दिनांक संदर्भिय प्रसिद्धीपत्रकानुसार जाहीर करण्यात आले होते. आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या अनुषंगाने विविध प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने आयोगाकडून ३१ ऑगस्ट २०२० व ४ सप्टेंबर २०२० पत्राद्वारे शासनाकडे संदर्भ करण्यात आला होता. त्यास अनुसरून शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भिय दिनांक ४ सप्टेंबर २०२० च्या परिपत्राद्वारे आयोगास कळवण्या आले आहे की, ‘आयोगाच्या परीक्षा आयोजनाबाबत शासनाने २६ ऑगस्ट २०२० च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय सदर पत्राद्वारे अयोगास अवगत करण्यात येत आहे. कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता आता राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणा-या उपाय योजना व लॉकडाउनचा कालावधी लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही कळवण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!