
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । सातारा शहरांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दहशत माजविणाऱ्या शुभम विनोद कांबळे वय 26 रा. बुधवार पेठ सातारा याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शुभम विनोद कांबळे याच्याविरुद्ध एमपीटीचा कायद्यान्वये रद्द करण्याचा प्रस्ताव शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी पाठवला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाने बजावलेली आहे. स्थानबद्द इसमाने त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून खुनाचा प्रयत्न करणे जबरी चोरी बेकायदेशीर जमाव जमवणे हत्यारा सहज जबर दुखापत करणे शिवीगाळ दमदाटी इत्यादी इत्यादी प्रकार सुरूच ठेवल्याने कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिन्हा यांनी शुभम कांबळे याला स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यामुळे कांबळेची रवानगी सातारा जिल्हा कारागृह येथे करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक आँचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक शाहूपुरी संजय पतंगे, अमित सपकाळ, हसन तडवी, स्वप्नील कुंभार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अजय कुमार बन्सल यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत 10 संघटित गुन्हेगारी टोळ्यामधील 65 गुन्हेगारांविरुद्ध मोकाची कारवाई केली आहे आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 85 अन्वये 132 हद्दपार केले आहे.