
स्थैर्य, सातारा, दि. 30 : शहर वासियांच्या दृष्टीने महत्वाचे असणारे प्रलंबित प्रश्न व जिह्यातील प्रश्नांच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे यांनी विविध विभागांच्या बैठका घेवून सुचना दिल्या. या बैठकीमध्ये मेडिकल कॉलेज, कास धरण उंची, सातारा शहर हद्दवाढ, दुष्काळी पाणी पुरवठा योजना या विषयावर उहापोह झाला. कामांचा आढावाही घेण्यात आला.
खासदार उदयनराजे यांनी जलमंदिर पॅलेस येथे बोलवण्यात आलेल्या बैठकीला सातारा नगरपरिषद अधिकारी, पाटबंधारे अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, जिल्हा कृषी व आरोग्य अधिकारी तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मेडिकल कॉलेज, कास धरण पाणी योजना, सातारा नगरपरिषद हद्दवाढ, जिह्यातील प्रलंबित दुष्काळी पाणी योजना यांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.सातारा जिह्यातील प्रलंबित व आगामी विकासकामांसंदर्भात आज जलमंदिर पॅलेस येथे विविध विभागांच्या बैठका पार पडल्या यावेळी सातारा नगरपरिषद अधिकारी, पाटबंधारे अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, जिल्हा कृषी व आरोग्य अधिकारी तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मेडिकल कॉलेज, कास धरण पाणी योजना, सातारा नगरपरिषद हद्दवाढ, जिह्यातील प्रलंबित दुष्काळी पाणी योजना यांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.