
दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२४ | फलटण |
लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज, दि. ३ एप्रिल २०२४ रोजी फरांदवाडी (ता. सातारा) येथे माळी समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ९ वाजता जिजाई मंगल कार्यालय, फलटण-सातारा रोड, फरांदवाडी येथे या बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीस फलटण व पंचक्रोशीमधील तमाम माळी समाजबांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण तालुका माळी समाज बांधव संघटनेकडून करण्यात आले आहे.