
स्थैर्य, फलटण, दि. १८ : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी नियमितपणे साजरा होत असतो. परंतु ह्या वर्षी भारतीय जनता पार्टीची एक महत्त्वाची मीटिंग दिल्ली येथे असल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मतदारसंघांमध्ये शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकत नाहीत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.