खासदार रणजितसिंहचा राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग; कालच पोस्ट केले होते सूचक WhatsApp स्टिकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुन २०२२ । फलटण । प्रसन्न रूद्रभटे । विधानपरिषदेचं मतदान पार पडताच नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सुरतला पोहचले आहेत. भारतीय जनता पार्टीने ही राजकीय खेळी केली आहे. याला फडणवीस आणि अमित शाहांचं पाठबळ मिळालं. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी याआधीही गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. यावेळीच हा कट शिजल्याची माहिती सुत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. मतदान झाल्यानंतर सुरतला रवाना व्हायचं, हे एकनाथ शिंदेंनी पूर्वनियोजित केलं होतं. हे सर्व होत असताना विधानपरिषदेच्या सर्व जागांवर भारतीय जनता पार्टी विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाच्या पोस्ट व्हायरल होत असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये ध्वज व त्यामध्ये “मी पुन्हा येईन” असे आशय असलेले स्टिकर WhatsApp ग्रुप वर व्हायरल केले होते. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाईक्स सुद्धा दिल्या होत्या. परंतु काल रात्री १० च्या सुमारास पोस्ट केलेल्या WhatsApp स्टिकरचा अर्थ आज समजू लागला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या राजकारणात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नेहमीच सक्रिय असतात. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सुद्धा विशेष विश्वास संपादन करण्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये आपले स्वतःचे असे वेगळे अस्तित्व हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्थापन केलेले आहे. राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याआधीच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये ध्वज व त्यामध्ये “मी पुन्हा येईन” असे आशय असलेले स्टिकर WhatsApp ग्रुप वर व्हायरल केले होते. त्याचा अर्थ सर्वसामान्य नागरिकांना जरी उशिरा समजला असला तरी राज्याच्या राजकारणात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सक्रिय आहेत, याची खात्री मात्र आता सर्वांनाच पुन्हा एकदा झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!