दैनिक स्थैर्य | दि. 16 मार्च 2024 | कोळकी | कोळकी गावामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. कोळकी हे फलटण शहराचे उपनगर आहे. त्यामुळे कोळकी गावाच्या विकासासाठी खासदार रणजितसिंह हे कटिबध्द आहेत; असे मत स्वराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कोळकी येथील मालोजीनगर येथे ज्येष्ठ नागरिक भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी अभिजीत नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रतिनिधी जयकुमार शिंदे, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांचे उपस्थिती होती.
कोळकी गावाची वाढती लोकसंख्या बघता कोळकीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी कार्यरत राहणार आहे. भविष्याचा विचार करता कोळकी गावासाठी पाणी पुरवठा योजना, उत्कृष्ठ प्रतीचे रस्ते व मूलभूत सुविधा देण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कटिबध्द आहोत; असेही यावेळी अभिजित नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.