दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
अनेक दिवसापासून प्रलंबित असणार्या फलटण-बारामती व फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्राने १२० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या रेल्वेमार्गाच्या कामाला निधी मंजूर केल्याबद्दल माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर या उभयतांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार करून आभार मानले.
यावेळी रेल्वेमंत्री बोलताना म्हणाले की, हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी मी निधीची कमतरता पडू देणार नाही. अनेक काळापासून रखडलेल्या या प्रकल्पाला फलटण-बारामतीसाठी १०० कोटी तर फलटण-पंढरपूरसाठी२० कोटी मिळाले असून १२० कोटींचा निधी मिळाल्यामुळे कामाला गती येणार आहे.
दरम्यान, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न त्यांचे चिरंजीव विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पूर्ण करत असल्याच्या भावना फलटण तालुक्यातील जनतेमध्ये दिसत आहे.