पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे कार्यालय हलवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. १४ : कराड पंचायत समितीच्या कक्ष अधिकारी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना  करोनाची बाधा होताच सातारा जिल्हा परिषदेत कडक नियमावली केली आहे. मात्र, सातारा पंचायत समितीत कोणी ही या आपलंच हाय अशी अवस्था झाली आहे. आरोग्य विभागाचे असलेले कार्यलय तूर्तास पंचायत समितीच्या सभागृहात करावे जेणेकरून सर्व्हे करून आलेल्या कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टनन्स ठेवून काम करता येईल, अशी मागणी होत आहे. परंतु पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे निर्णय क्षमता घेण्याचे धाडस नाही.

करोनाच्या संकटात सातारा पंचायत समितीमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही. नुसते सानिटायझर मशीन बसवून उपयोग नाही.सातारा पंचायत समितीच्या आवारात कोणी ही येते आणि कोणीही जाते. दाटीवाटीने वेगवेगळे विभाग एकाच खोलीत काम करतात. तर आरोग्य विभाग एका खोलीत काम करतो. सोशल डिस्टनन्स पाळला जात नाही.सध्या तालुक्यात  करोना चा कहर वाढत चालला आहे.तेथे प्रत्यक्ष सर्व्हेला असणारे कर्मचारी सर्व्हे करून माहिती देण्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागात त्या कक्षात येतात तेव्हा अगोदर अरुंद खोली, त्यात सोशल अंतर कसे पाळले जाणार?, यासाठी आरोग्य विभागाचे कार्यलय तात्पुरते पंचायत सभागृहात हलवण्यात यावे अशी मागणी होत आहे. परंतु पदाधिकारी यांच्याकडे निर्णय क्षमता नसल्याने कराड पंचायत समितीची जशी अवस्था झाली तशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!